Posts

संविधान दिन विशेष लेख

Image
       भारतीय राज्यघटनेला आज ७० वर्षे पूर्ण झाली. या सत्तर वर्षात   भारताने अनेक आव्हाने पेललीत , अनेक संकटांना देशाला सामोरे जावे लागले असे असले   तरी भारतीय राज्यघटनेने   राजकीय व्यवस्थेची उभारलेली   संस्थात्मक बांधणी आजही तशीच टिकून आहे.पाकिस्तान व चीन सारख्या विरोधी शेजारील राष्टांशी मुकाबला करीत असताना आपला आर्थिक विकास दर कायम राखत भारताने आपली   लोकशाही मुल्यांवरील आस्था आजपर्यंत कायम ठेवण्यात यश मिळवलेले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. युरोप व जगातील अनेक देशात जेवढे मतदार असतात.तेवढे किंवा त्यापेक्षा अधिक निवडणूक कर्मचारी भारतातील निवडणूक प्रक्रिया दर पाच वर्षांनी   पार पाडीत असतात. भारतीय   राज्यघटनेने आपल्याला काय दिले ? याचा विचार करण्यापूर्वी हा विचार   देखील विचार प्रत्येक भारतीयाने करावा कि देशात   घटना अस्तित्वात येण्यापूर्वी सामाजिक व राजकीय परिस्थिती कशी होती ? कोणत्या राजकीय मूल्यांना समोर ठेवून आपली राज्य व्यवस्था काम करत होती. ?   घटनेनुसार संसद व न्यायमंडळ यात ...

कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुण्यतिथी विशेष लेख.

Image
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारः कर्मवीर भाऊसाहेब हिरे   प्रा. विद्या सुर्वे बोरसे                                                                 मुख्याधिकारी                                                            जनसंपर्क विभाग                                                      महात्मा गांधीविद्यामंदिर   संपर्क – ९४०५५४७००२     दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने भाऊसाहेब हिरे यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध.       एखादे राज्य, ए...

महात्मा गांधी विद्यामंदिर

Image
   महात्मा गांधी विद्यामंदिर   उदात्त स्वप्नपुर्तीची सात दशके   -     प्रा. विद्या सुर्वे बोरसे, नाशिक   ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा पूर्वजांनी दिलेला केवळ एक मुलमंत्र नाही. देशातील महान नेतृत्वाने युगानुयुगे जपलेले समाजाच्या उद्धाराचे ते एक मंगलमयी स्वप्न आहे.  हजारो वर्षांपासून हे स्वप्न सतत पाहिले गेले आहे, इतिहासातील थोर व्यक्तिमत्वांनी हे स्वप्न साकार करण्याचा त्यात्या काळात प्रयत्न केला आहे. एकोणिसाव्या शतकात या मुलमंत्राला महात्मा जोतीबा फुले यांनी नवा आयाम दिला. या स्वप्नाकडे जाण्यासाठी शिक्षणाचा नवा विचार जोडला. विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी ही ज्ञानज्योत तेवती रहावी यासाठी समाजाचे दिग्दर्शन केले. या उजेड यात्रिकांच्या वाटांवर चालणारे आणि बहुजनांच्या उन्नतीसाठी ज्ञानाच्या महासागराला वाडीवस्तीत, डोंगरद-यात घेऊन जाणारे एक होते कर्मवीर भाऊसाहेब हिरे. स्वातंत्र्यसेनानी, बहुजन समाजाचे नेते, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते, आदिवासी, कष्टकरी, श्रमिकांसाठी संस...