संविधान दिन विशेष लेख
भारतीय राज्यघटनेला आज ७० वर्षे पूर्ण झाली. या सत्तर वर्षात भारताने अनेक आव्हाने पेललीत , अनेक संकटांना देशाला सामोरे जावे लागले असे असले तरी भारतीय राज्यघटनेने राजकीय व्यवस्थेची उभारलेली संस्थात्मक बांधणी आजही तशीच टिकून आहे.पाकिस्तान व चीन सारख्या विरोधी शेजारील राष्टांशी मुकाबला करीत असताना आपला आर्थिक विकास दर कायम राखत भारताने आपली लोकशाही मुल्यांवरील आस्था आजपर्यंत कायम ठेवण्यात यश मिळवलेले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. युरोप व जगातील अनेक देशात जेवढे मतदार असतात.तेवढे किंवा त्यापेक्षा अधिक निवडणूक कर्मचारी भारतातील निवडणूक प्रक्रिया दर पाच वर्षांनी पार पाडीत असतात. भारतीय राज्यघटनेने आपल्याला काय दिले ? याचा विचार करण्यापूर्वी हा विचार देखील विचार प्रत्येक भारतीयाने करावा कि देशात घटना अस्तित्वात येण्यापूर्वी सामाजिक व राजकीय परिस्थिती कशी होती ? कोणत्या राजकीय मूल्यांना समोर ठेवून आपली राज्य व्यवस्था काम करत होती. ? घटनेनुसार संसद व न्यायमंडळ यात ...